महिलेचा विनयभंग; श्रीरामपूरचे सहा तरुण राजूर पोलिसांच्या ताब्यात

भंडारदरा येथील नाणी फॉल जवळील घटना
महिलेचा विनयभंग; श्रीरामपूरचे सहा तरुण राजूर पोलिसांच्या ताब्यात

राजूर | वार्ताहर

अकोले (Akole) तालुक्यातील भंडारदरा (Bhandardara) परिसरात पर्यटकांची (tourists) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र मद्यपी आणि व्यसनाधिन युवक पर्यटकाकडून स्थानिक नागरिक, पोलीस आणि छोटे-मोठे दुकानदार यांच्यावर जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत.

अशा घटना ताज्या असतानाच श्रीरामपूर (Shrirampur) येथील युवकांनी दोन हॉटेल चालकांना मारहाण करून एका महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारदरा धरण परिसरातील नाणी फॉल (Nani Falls Bhandardara) येथे येथे घडलीआहे.

तू फार चांगली दिसते म्हणत श्रीरामपूर तालुक्यातून आलेल्या पर्यटकांनी थेट एक महिलेला मिठी मारुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या महिलेने त्यांना विरोध केल्याने तिचा बुचूडा धरुन समोरच्या टेबलावर अपटला. तसेच टपरीतील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढईतील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉलमधील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत आरोपी श्रीराम केशव जंगले (वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर), अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28 रा. श्रीरामपूर), उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर), सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर), वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर), विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहेत. पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार आदी करत आहेत.

Related Stories

No stories found.