महिलेच्या विनयभंगप्रकरणी तांदुळवाडीच्या तिघा जणांवर गुन्हा दाखल

महिलेच्या विनयभंगप्रकरणी तांदुळवाडीच्या तिघा जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात एका 28 वर्षीय विवाहित महिलेशी तिघा जणांनी तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील तिघा जणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 10 डिसेंबर रोजी त्या महिलेच्या घरात घडली.

ती विवाहित महिला दुपारी चार वाजे दरम्यान तिच्या घरातील पडवीमध्ये होती. त्यावेळी आरोपी हे दारूच्या नशेत मोटारसायकलवर बसून तिच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी तिला म्हणाले, तुझा पती कोठे आहे? त्याला आम्हाला दडी लाख रुपये द्यायचे आहेत. तेव्हा महिला म्हणाली, तुमचा व्यवहार तुम्ही त्यांच्या सोबत पाहून घ्या. त्याचा राग आल्याने आरोपींनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा ती महिला तिच्या आजीसासूला बोलाविण्यासाठी घरात गेली. तेव्हा आरोपींनी तिच्या घरात जाऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्या महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी संकेत बाबासाहेब मोरे, अभिजीत शिवाजी मोरे, आकाश राजेंद्र बेलकर सर्व रा. तांदूळवाडी या तिघा जणांवर गुन्हा रजि. नं. 1011/2021 भा.दं.वि. कलम 354, 354 ब, 452, 323, 504, 34 प्रमाणे विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.