महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी

उपनगरातील घटना; तरूणासह तिघांविरूध्द गुन्हा
महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरूणाने (Youth) दरवाजा (Door) तोडून बळजबरीने घरात घुसून महिलेचा विनयभंग (Molestation of a woman) केला. वेळोवेळी फोन, मेसेज करत ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची (Beating) व बदनामी (Defamation) करण्याची धमकी (Threat) दिली असल्याची फिर्याद येथील एका उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिली आहे. या प्रकरणी किरण हरीभाऊ साबळे, त्याची आई मंदा साबळे व पत्नी (रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी (Harassment, Beatings, Threats) आदी कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

किरणने फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनेकवेळा फोन केल्याने त्यांनी त्याचा नंबर ब्लँक लिस्टमध्ये टाकला होता. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किरण हा दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरासमोर आला. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग (Molestation) केला. त्यांची आई मंदा साबळे तेथे आली तिने फिर्यादीला मारहाण (Beating) केली. माझ्याविरूध्द पोलिसांत तक्रार दिली तर तुला आम्ही जिवंत मारून पुरावा नष्ट करू, तुला आत्महत्येस मजबुर करून, अशी धमकी (Threat) दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.