राहुरीत शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात महिलेचा विनयभंग

आरोपीवर गुन्हा दाखल
राहुरीत शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात महिलेचा विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरहद्दीत शेतीच्या बांधावर इलेक्ट्रीक खांब रोवण्याच्या कारणावरून आरोपीने एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक 30 वर्षीय महिला राहुरी नगरपरिषद हद्दीत राहत आहे. तिने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे नातेवाईक शेतीच्या सामाईक बांधावर चालू असलेले इलेक्ट्रीक खांब रोवण्याचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले व फिर्यादीस म्हणाले, तुम्ही बांधावर खांब का रोवता? असे म्हणाले असता फिर्यादी हे आरोपीला म्हणाले, आम्ही बांधापासून दोन फूट अंतर सोडून खांब रोवत आहोत.

असे म्हणाल्याचा आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून फिर्यादीचे पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची जाव त्यांचे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी कोंडिराम मंजाबापू गुलदगड रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी याच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com