वीरगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दोन परप्रांतीय कपडे विक्रेत्यांविरुध्द गुन्हा दाखल
वीरगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोले |प्रतिनिधी| Akole

कपडे विकण्याचा बहाण्याने आलेल्या परप्रांतिय कपडे विक्रेत्यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation of a minor girl) केल्याची घटना अकोले (Akole) तालुक्यातील वीरगावात (Virgav) घडली.

गुरुवारी 8 जुलै रोजी दुपारच्या वेळी ही मुलगी घरात एकटी असताना दोन परप्रांतिय तरुण घरात गेले. त्यातील सावेज भुरा कुरेशी याने घरात घुसून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुला फुकट कपडे देतो असे म्हणत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी त्याचा साथीदार आसिफ वकील कुरेशी याने दारात थांबून त्याला साथ दिली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यातील एकजण पळून गेला. दुसर्‍याला पकडून नागरिकांनी चोप दिला. अकोले पोलीस ठाण्याला (Akole Police Station) संपर्क करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोघेही आरोपी रा. शिक्रापूर, ता. शहापूर, जि. ठाणे येथील असून ते मुळचे मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशचे आहेत. सध्या संगमनेर येथे ते वास्तव्यास आहेत. याबाबत 40 वर्षीय महिलेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अकोले पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम 354 ब, 452, 34 बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे (PI Mithun Ghuge) करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com