मोहरम : मार्गदर्शक सूचना जारी

ताजिया काढण्यास परवानगी नाही
मोहरम : मार्गदर्शक सूचना जारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचे आवाहन राज्य सरकारने केले असून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मातम मिरवणूक- कोव्हिड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र आणि राज्य सरकारकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करू नये.

वाझ/मजलीस- हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

ताजिया/आलम- ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावे.

सबील/छबील- सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी. त्याठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही.

कोव्हिड संसर्ग परिस्थितीचा विचार करता रक्तदान, प्लाझ्मा, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावीत.याशिवाय स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com