मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सवाची जय्यद तयारी

शासनाच्या निर्बंधांचे पालन करून होणार उत्सव
मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सवाची जय्यद तयारी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

निर्सगाचे वरदान लाभलेल्या मोहटादेवी (Mohotadevi) गडावर नवरात्र महोत्सवाची (Navratra Festival) तयारी पुर्ण झाली असून देवस्थान (Trust) समितीतर्फे शासन आदेशाचे पालन करत नवरात्रोत्सव संपन्न होणार आहे.

येत्या गुरुवारपासून सुरू होणार्‍या शारदीय नवरात्रौत्सव निमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा देवस्थान समितीचा (Temple Committee) अंदाज आहे.मात्र उत्सव नियोजन संदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळाले नसल्याने विश्वस्त मंडळापुढे समस्या निर्माण झाली आहे. यंदा प्रथमच समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे नवरात्रीतील एक दिवस भाविक आपल्या घरापासून देवी मंदिरापर्यंत पायी चालत येतो.

पुणे (Pune), नगर (Nagar), औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), श्रीरामपूर (Shrirampur), बारामती (Baramati) अशा विविध भागातून हजारो भाविक पायी चालत देवी दर्शनासाठी मोहटा गडाकडे येतात.सर्व जाती-धर्माचे भाविक पायी चालत येणार्‍यांमध्ये असल्याने वेगळेच जातीय सलोख्याचे समीकरण यात्रा कालावधीमध्ये पहायला मिळते. यंदा मिरवणूक, यात्रा,घटी बसणे, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद वाटप अशा सर्व कार्यक्रमांना शासनाची बंदी आहे. यावर्षी मोहटादेवी परिसरातील मन मोहून टाकणारे निसर्गरम्य वातावरण भाविकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

तासात सोडायचा गड

प्रशासनाच्या आदेशानुसर इतर कार्यक्रमांना बंदी असून फक्त दर्शन घेऊन भाविकांनी मंदिर व गड परीसर सोडायचा आहे. तशा दृष्टीने देवस्थान समितीने संपूर्ण तयारी केली आहे.राज्य परिवहन महामंडळाची ऐनवेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या विविध भागांमधून दिवसा तर पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावरून अहोरात्र बससेवा भाविकांच्या उपलब्धतेनुसार सुरू राहणार आहे.

Related Stories

No stories found.