मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्तमंडळ जाहीर

न्या. यार्लगड्डा यांच्याकडून घोषणा
मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्तमंडळ जाहीर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त मंडळ आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी आज अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी जाहीर केले.

मोहटादेवी विश्वस्त पदाचा कार्यकाल तीन वर्षासाठी असतो. मोहटे गावातून पाच व राज्यातील भाविकांमधून पाच विश्वस्तांची निवड केली जाते. मागील विश्वस्त मंडळाची मुदत यावर्षी संपली होती. देवस्थानच्यावतीने नवीन विश्वस्त पदासाठी अर्ज मागविले होते. त्यातून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर नवीन विश्वस्त मंडळ आज जाहीर करण्यात आले. यामध्ये मोहटे गावातील पाच विश्वस्तांमध्ये शिशिकांत रामनाथ दहिफळे, बाळासाहेब किसन दहिफळे, प्रतिभा नितीन दहिफळे, विठ्ठल अजिनाथ कुटे, अक्षय राजेंद्र गोसावी यांचा सामावेश आहे.

मोहटे गाव व्यतिरिक्त राज्यातील भाविकांमधून श्रीराम गंगाधर परतानी ( पुणे), अ‍ॅड. कल्याण दगडू बडे (औरंगाबाद), डॉ.श्रीधर मधुकर देशमुख (पाथर्डी), अनुराधा विनायक केदार (पाथर्डी), अ‍ॅड. विक्रम लक्ष्मण वाडेकर (अहमदनगर) अशा पाच जणांची निवड झाली. सर्व विश्वस्तांचे श्री मोहटादेवी देवस्थानचे अध्यक्ष तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, पाथर्डीच्या न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश तथा पदसिद्ध विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक अहमदनगर सुवर्णा माने, पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी अभिनंदन केले आहे. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com