मोदी सरकारने सामान्य जनतेची माफी मागावी

ना.थोरात : महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा
मोदी सरकारने सामान्य जनतेची माफी मागावी

अहमदनगर | प्रतिनिधी

अर्थव्यवस्था (Economy), रोजगार (employment), महागाई (inflation), पेट्रोल दरवाढ (petrol price hike) आणि करोना (Corona) हाताळणी अशा सर्व आघाड्यांवर केंद्रातील मोदी सरकार (Modi Govt) अपयशी ठरले आहे. त्यांनी देशाची दूरवस्था केल्याबद्दल आधी देशाची माफी मागावी, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केली.

ना.थोरात शनिवारी नगर दौऱ्यावर आहेत. पत्रपरिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, 7 वर्षात मोदी सरकारने देशाची अवस्था काय केली, या प्रश्नाचं उत्तर काळजी वाढवणार आहे. आज महागाई नव्या उंचीवर पोहचली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला गेली. नवे रोजगार तर निर्माण झालेच नाही, होते ते बुडाले. गंगेच्या पाण्याचं पावित्र्य टिकलं आहे का, असा प्रश्न करोना काळात दिसलेल्या चित्रावरून निर्माण झाला. यावरून केंद्र सरकारची करोना हाताळणी उघडी पडली. महाराष्ट्र शासनाने कधी करोना आकडे लपवले नाहीत. भाजप सरकार असलेल्या राज्यांनी काय केले, हे वेगळे सांगायला नको.

आज पेट्रोल दराचा भडका उडाला आहे. आधी 1 रुपये दरवाढ झाली की आंदोलन करणारे नेते आता पेट्रोल 100 रुपये पार झाल्यावर आंदोलन करताना दिसत नाहीत, असा टोला त्यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

केंद्राच्या सहकाराचा हेतू समजला नाही

केंद्राच्या सहकार मंत्रालय (Ministry of Co-operation) स्थापन करण्याचा हेतू समजला नाही, असा चिमटा काढत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

जिल्हा प्रशासन सज्ज

ना.थोरात यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. ऑक्सिजन (Oxygen) आणि औषध या बाबत सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तिसऱ्या लाटेला (Corona third wave) आपण सक्षमपणे तोंड देण्यास सज्ज आहोत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत झाली, तशी अवस्था होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com