काळे कारखान्याचे आधुनिकीकरण

कारखान्याची गाळप क्षमता वाढणार : आ. आशुतोष काळे
काळे कारखान्याचे आधुनिकीकरण

कोपरगाव (प्रतिनिधी) - मागील 60-70 वर्षात कारखान्याची जुनी झालेली यंत्रसामुग्री त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला होता. स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करून एक नवीन आधुनिक यंत्रसामुग्री उभारणी हि काळाची गरज असल्याचे ओळखून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात आहे त्या प्लँटमध्ये, आहे त्या जागेतच आधुनिकीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेज मध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या आधुनिकीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. यावेळी आ. काळे म्हणाले, मागील 60-70 वर्षात काळानुरूप योग्य त्या मशिनरी वाढवून आवश्यकतेनुसार बदल केल्यामुळे आजरोजी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 4 हजार मे.टन आहे.

कारखान्याची जुनी झालेली यंत्रसामुग्री त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला होता. आधुनिकीकरणामुळे मनुष्यबळात व खर्चात बचत होणार आहे. कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित जोपासले असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नेहमीच योग्य दर दिला आहे. यापुढेदेखील साखर उत्पादनात कमीत कमी खर्च करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. फॅक्टरी प्लँटची दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये प्रथमतः पहिल्या फेजमध्ये 110 मे.टन, 45 केजी प्रेशरचा एक बॉयलर, मिल टेंडम, जनित्र संच आदींची उभारणी केली जाणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com