मोक्का गुन्ह्यात दोन आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी

तोफखाना ठाण्यात केला होता चाकू हल्ला
मोक्का गुन्ह्यात दोन आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या दोघा आरोपींना येथील विशेष मोक्का न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश भाऊसाहेब डाके, गणेश भगवान कुर्‍हाडे अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सरकारी वकिल अनिल ढगे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

अहमदनगर शहरातील बोल्हेगाव भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले होते. त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी सचिन निकम यांच्या फिर्यादीवरून गणेश कुर्‍हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश चौरे यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील आरोपी डाके व कुर्‍हाडे यांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com