मोक्का गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
मोक्का गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बेलवंडी (ता. श्रीगोंदा) (Belwandi) येथील मोक्का व दरोड्याच्या (Mocca and Robbery) गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद (Accused LCB Arrested) केला आहे. राजेंद्र मधुकर उबाळे (वय 35 रा. कुरूंद ता. पारनेर) असे जेरबंद (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजाराम चंदर ढवळे (वय 44 रा. राजापूर शिवार ता. श्रीगोंदा) यांची राजापूर शिवारातील घोडनदी (Ghod River) पात्रालगत शेत जमीन आहे. जमिनी मधील चिंचणी धरणाचे पाणी (Dam Water) कमी झाल्यानंतर ढवळे हे चारा पिकवून काही क्षेत्रामधील मातीची विक्री करतात. संतोष राधू शिंदे (रा. राजापूर) व त्याच्या साथीदारांनी जेसीबी (JCB) व पोकलँनच्या सहाय्याने माती बळजबरीने नेली होती. या गुन्ह्यात आरोपी विरूध्द मोक्कान्वये वाढीव कलम लावण्यात आले होते.

या गुन्ह्यातील पसार आरोपी राजेंद्र उबाळे हा वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सागर ससाणे, रोहित येमूल, रवींद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, रणजित जाधव, आकाश काळे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने सापळा लावून आरोपीला जेरबंद केले. आरोपी राजेंद्र उबाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द सुपा आणि बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belwandi Police Station) गुन्हे दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com