<p><strong>अहमदनगर|Ahmedagar</strong></p><p>गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हौशीराम सिताराम आंत्रे (वय- 42 रा. सोनगाव सात्रळ ता. राहुरी) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.</p>.<p>अभय विजय जाधव (वय- 19 रा. लोणी बु. ता. राहाता) यांचा मोबाईल लोणी येथील कॉफी शॉप मधून चोरीला गेला होता. जाधव यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, सोनगाव सात्रळचा हौशीराम आंत्रे याने हा मोबाईल चोराला आहे. निरीक्षक कटके यांनी त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, पोलीस शिपाई रणजित जाधव, चंद्रकांत कुसळकर यांना आरोपीला अटक करण्याच्या सुचना केल्या. पोलिसांनी सोनगाव सात्रळ गावामध्ये सापळा रचून आंत्रे याला अटक केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.</p>