श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील मध्यवस्तीत बस स्टँडशेजारी नेवासा रोडवर असलेल्या एका मोबाईल शॉपी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून

शॉपीतील अडीच लाख रुपये रोख व अंदाजे 7 लाख रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 9 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शहरातील स्टँडशेजारीच वर्दळीच्या ठिकाणी काल पहाटे असलेल्या श्रेया मोबाईल शॉपी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून एकजण दुकानात घुसला. अन्य त्याचे साथीदार बाहेर उभे होते. चोरट्यांनी तोंडाला मास्क लावले असल्यामुळे या चोरट्यांची पूर्ण ओळख पटू शकली नाही.

आतमध्ये गेलेल्या चोरट्याने गल्ल्यात असलेले अडीच लाख रुपये रोख तसेच तोंडात बॅटरी पकडून पाठिवर लटकविण्याच्या सॅक बॅगमध्ये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल भरत गेला. या सर्व मोबाईल अंदाजे 7 लाख रुपये असावे, असा एकूण 9 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची शक्यता वर्तविली गेली.

भर बाजार पेठेत वर्दळीच्या ठिकाणचे मोबाईल शॉपीचे दुकान फोडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक समाधान सुरवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील वपोलीस पथकाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण दुकानाची पहाणी करत चौकशी केली.

माल किती गेला याचा अंदाज रात्री उशिरापर्यंत कळाला नव्हता. मात्र या शॉपीचे मालक जितेंद्र रुपचंद कासलीवाल यांनी सांगितले की, गल्ल्यात असलेले अडीच लाख रुपये तसेच 7 लाख रुपये किंमतीचे महागडे मोबाईल चोरुन नेले असल्याची माहिती दिली. याप्रकरणी जितेंद्र रुपचंद कासलीवाल यांनी श्रीरामपृर शह पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.