मोबाईलच कुपोषित; गरोदर माता व बालके कसे होणार पोषित ?

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन, 600 मोबाईल केले परत
मोबाईलच कुपोषित; गरोदर माता व बालके कसे होणार पोषित ?

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शासनाने अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Worker) दिलेले मोबाईल (Mobile) निकृष्ट दर्जाचे असल्याने राहाता (Rahata) तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Worker) पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयासमोर निदर्शने करत मोबाईल (Mobile) वापसी आंदोलन (Movement) केले. शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ट असून उच्च प्रतिचे मोबाईल देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील तब्बल 600 अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Worker) हे मोबाईल प्रकल्पाधिकारी यांना सुपूर्द केले.

अगोदर असलेला कॅस (Cass) हा चांगल्या प्रकारे चालणारा अ‍ॅप बंद (App closed) करून केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रेकर अ‍ॅप सदोष असून शासनाने दिलेले निकृष्ट प्रतिचे मोबाईल त्याकामी कूचकामी ठरत आहेत. मोबाईलची वापर क्षमता कमी असून अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. थोड्या वापराने देखील हे मोबाईल गरम होतात. मोबाईल (Mobile) अनेकदा नादुरूस्त होतात त्यावेळी त्याच्या दुरूस्तीचा खर्च मिळत नाही. आधीच तुटपुंजे वेतन असताना स्वखर्चाने मोबाईल रिपेअर (Mobile repair) करावा लागतो. त्यामुळे राहाता (Rahata) तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरित्या हे सर्व मोबाईल प्रकल्प अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले.

राहाता पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या या मोबाईल वापसी आंदोलनात युनियनच्या जिल्हाध्यक्षा मदीना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, सहचिटणीस जीवन सुरूडे, वंदना गमे, मनीषा जाधव, वैशाली नाईक, ज्योती बोर्‍हाडे, नसिमा शेख, सिमा आरंगळे, सविता लोंढे, ज्योती पंडित, शकिला पठाण, कल्पना नगरकर, बेबी उगले, सुनीता सुराशे, मनोरमा उदावंत, जनाबाई शेळके यांचेसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सदर मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून 2018 साली हे मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात आले होते. त्याची वॉरंटी संपली असून मोबाईल गरम होणे, बॅटरी फुटणे, रॅम आणि स्पेस कमी असल्याने डाटा भरण्याचे काम करणे कठीण आहे. अंगणवाडी सेविकांचे काम कमी होण्याऐवजी दुपटीने वाढले आहे. उच्च प्रतीचा मोबाईल मिळावा या मागणीसाठी मोबाईल वापसी आंदोलन करत 600 मोबाईल परत करण्यात आले आहेत. राज्यात अडीच लाख मोबाईल शासनाला परत देणार आहोत.

- राजेंद्र बावके, जिल्हा सचिव, अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियन

अगोदरच्या अ‍ॅपमध्ये चांगले काम करता आले मात्र नवीन अ‍ॅपमुळे काम करणे मुश्कील झाले असून डाटा फीड होत नाही. मोबाईल नादुरुस्त झाल्यावर दुरुस्तीचा खर्च व्यक्तिगत करावा लागतो. गरोदर माता पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी इत्यादीचा डाटा भरावा लागतो. सदर अ‍ॅप इंग्रजीमध्ये असल्याने चुका होण्याची शक्यता असून नवीन मोबाईलसह अ‍ॅप मराठीत उपलब्ध करून द्यावे जेणेकरून काम करणे सोपे जाईल.

- ज्योती बोर्‍हाडे, अंगणवाडी सेविका

अ‍ॅप आणि मोबाईलबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. पण काम करावे लागत असल्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना उच्च प्रतीचा मोबाईल मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत.

- कुसुम नागरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com