तीन मोबाईलसह दोन लॅपटॉपची चोरी

लालटाकी परिसरातील घटना
तीन मोबाईलसह दोन लॅपटॉपची चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लालटाकी येथील नारायण चेंबर्समधून घराचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्याने तीन मोबाईलसह दोन लॅपटॉप चोरून नेले. बुधवारी सकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस सुरेशप्रसाद तिवारी (वय 34 रा. लालटाकी) यांनी याबाबत फिर्याद दिली. बुधवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दूधवाला येऊन गेल्यावर घराचा दरवाजा आतून लॉक न करता लोटला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तिवारी यांना जाग आल्यावर त्यांना मोबाईल दिसून आले नाहीत. तसेच घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.

शेजारी राहणार्‍यांनी दरवाजा उघडला. तिवारी यांनी पुन्हा घरात जावून पाहिले असता घरातील तीन मोबाइल व दोन लॅपटॉप चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.