
राहाता |वार्ताहर| Rahata
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राहाता तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व मनसे सैनिकांनी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे हनुमान मंदिरात बुधवारी 4 मे रोजी सकाळी 10 वाजता हनुमान महाआरती व हनुमान चालिसा पठण केले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विजय मोगले, उपतालुकाध्यक्ष गणेश जाधव, सुधाकर वाघमारे, प्रशांत वाकचौरे, पुणतांबा शहराध्यक्ष संदीप लाळे, अनिल निकम, भाऊसाहेब सोनवणे, प्रसाद महाले, हनुमान भक्त योगेश मखाना, शुभम मुर्तडक, ऋषी बाबर, अनिकेत सोमवंशी यांच्यासह असंख्य नागरिक तसेच मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहाता येथील हनुमान मंदिर हे शहरातील जामा मज्जित समोर असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी हनुमान मंदिर व जामा मज्जित यामध्ये बॅरिकेट्स लावून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवला होता.
जोपर्यंत मस्जिदीवरील भोंगे खाली उतरवण्यात येत नाही तोपर्यंत सर्वच ठिकाणी हनुमान मंदिरात वारंवार हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे.
- राजेश लुटे, मनसे जिल्हाध्यक्ष