अमित ठाकरे 12 ऑक्टोबरला भगवानगडावर

अमित ठाकरे 12 ऑक्टोबरला भगवानगडावर

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड येथे 12 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी दिली.

यापूर्वी मनसेचे प्रमुख राज ठाकरे देखील श्रीक्षेत्र भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येऊन गेले आहेत.आता त्यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे बुधवारी दुपारी 4 वाजता येणार असल्याने मनसे सैनिकांची मोठी गर्दी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अमित ठाकरे यांचा दौरा होत असल्याने या दौर्‍याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भालगाव पंचायत समिती माजी सदस्य देविदास खेडकर यांनी खरवंडी येथे ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. या दौर्‍याच्या माध्यमातून अमित ठाकरे मनसे सैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोणता कानमंत्र देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

श्रीक्षेत्र भगवानगड येथे अमित ठाकरे दर्शनासाठी येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या दौर्‍यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com