PHOTO : श्रीरामपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

PHOTO : श्रीरामपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

श्रीरामपूर | Shrirampur

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्यामुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेय.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून (Police) आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे.

मशिदींवरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.

तसेच शहरातील सय्यद बाबा चौक येथील मशिदीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.