आमदारांच्या पेन्शनवरून मुख्य सचिवांना नोटीस

एकीकडे कोट्यवधींचा खर्च तर आयुष्यभर राबलेल्यांकडे कानाडोळा
आमदारांच्या पेन्शनवरून मुख्य सचिवांना नोटीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आमदारांच्या पगार व पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जुनी पेन्शन नाकारली जात असल्याप्रकरणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने राज्य कार्यकारणी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे.

आमदारांच्या पेन्शनवरून मुख्य सचिवांना नोटीस
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

आमदारांच्या पगार व पेन्शनला कोट्यावधी रुपये लागतात. मात्र निधी नसल्याचे कारण देत शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पेन्शन योजनाच बासनात गुंडाळण्यात आली आहे. राज्यकर्त्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी पगार व पेन्शनला बढती देखील दिली आहे. आयुष्यातील 30 ते 32 वर्षे शासकीय नोकरी करणार्‍या कर्मचार्‍याला 22 ते 25 हजाराची पेन्शन मिळते. पाच वर्षे आमदार म्हणून काम करणार्‍या लोकप्रतिनिधीला 50 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. ही मोठी तफावत असून, एका बाजूला शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे पगार आणि पेन्शन या सुविधांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नावर गळ्यात गळे घालत असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीचे डमाळे यांनी केला आहे.

सरकारी तिजोरी पैसे नसल्याने जनहितासाठी आजी-माजी आमदारांनी पेन्शन, पगार, भत्त्यांचा लाभ न घेता एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन सैनिक समाज पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे. तर याबाबत जनतेने देखील आपले मत खुल्या पध्दतीने मांडण्याचे आवाहन केले आहे. जनमताचा आदर करुन आजी-माजी आमदारांची मोठ्या प्रमाणातील पेन्शन व पगारबाबत निर्णय घेण्याचे नोटीसद्वारे मुख्य सचिवांना कळवले असल्याची माहिती डमाळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com