कुपोषणमुक्त गावासाठी कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्न करावेत- आ. विखे

कुपोषणमुक्त गावासाठी कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्न करावेत- आ. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

विकासाच्या प्रक्रीयेबरोबरच कुपोषणमुक्त गावाचा संकल्प करण्यासाठी आता गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी

सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जनसेवा फाउंडेशन आणि संगमनेर तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडीतील बालकांना ब्रिटानिया कंपनीच्या सहकार्याने पौष्टीक बिस्कीटांचे वितरण आ. विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. ज्येष्ठनेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, बाळासाहेब मांढरे, माधवराव भोसले, कैलासराव तांबे, भगवानराव इलग, जिल्हा परिषद सदस्या रोहीणी निघुते, पं.स सदस्य गुलाबराव सांगळे, दिपाली डेंगळे, रखमाजी खेमनेर, अ‍ॅड. सदाशिव थोरात, रामभाऊ भूसाळ, एकनाथ नागरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेतील लाभार्थ्यांना ठेव पावतीचे वितरण तसेच मंजूर झालेल्या लाभधारकांना रेशनकार्ड आणि गटई कामगारांना स्टॉलचे वितरण करण्यात आले.

आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले, कुपोषित बालके सापडणे हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे, अशी खंत व्यक्त करून पौष्टीक बिस्कीट देण्याचा उपक्रम राज्यात शिर्डी विधानसभा मतदार संघात होत आहे. सामाजिक दायित्व म्हणून जनसेवा फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला. आपल्या मतदार संघात ही संख्या खूप कमी असली तरी, कुपोषणमुक्त गावासाठी आता ग्रामपंचायत, सोसायट्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी कुपोषणमुक्त गावाचा प्रयत्न करण्यासाठी संकल्प करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळीग्राम होडगर यांनी विखे पाटील परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच कुटुंबामध्ये महिलांच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे त्यांच्याही आरोग्याच्यादृष्टीने व्यवस्थेतून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त करून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची माहिती देताना ही बिस्कीटे कुपोषित बालकांसाठी आहेत. दिवस कमी वजनाच्या बालकांना ही बिस्कीटे देण्याबाबतचे नियोजन त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. रोहिणी निघुते यांचेही याप्रसंगी भाषण झाले. प्रकल्प आधिकारी सौ. वैशाली कुकडे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार आधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी सरंपच संदीप घुगे, उपसरपंच गोकुळ दिघे, दादा पाटील गुंजाळ, सुशिल भंडारी, संजय गांधी, भागवतराव उंबरकर, विनायकराव बालोटे, मकरंद गुणे, किशोर जर्‍हाड, प्रकाश उंबरकर, अ‍ॅड. अनिल भोसले, कांचनताई मांढरे, सौ. सुजाता थेटे, सौ. शैलजाताई नांवदर, प्रशांत कोंडीलकर आदिंसह पंचायत समितीचे प्रकल्प आधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com