बँकेच्या सर्व शाखांमधून ऑनलाईन कर्ज प्रक्रीया सुरू करण्यात येणार

आ. राधाकृष्ण विखे; प्रवरा बँकेच्या दाढ शाखेचे स्थलांतर
बँकेच्या सर्व शाखांमधून ऑनलाईन कर्ज प्रक्रीया सुरू करण्यात येणार

लोणी |प्रतिनिधी| Loni

प्रवरा सहकारी बँकेच्या ग्राहकांना चांगल्या सुविधेच्या माध्यमातून सेवा मिळावी या उद्देशाने आता

बँकेच्या सर्व शाखांमधून ऑनलाईन कर्ज प्रक्रीया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

प्रवरा सहकारी बँकेच्या दाढ येथील शाखेचे स्थलांतर करण्यात आले. नवीन कार्यालयाचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते आणि माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी सभापती नंदाताई तांबे, बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, व्हाईस चेअरमन अशोक आसावा, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडु, संचालक देवीचंद तांबे, अ‍ॅड. भानुदास तांबे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, सरपंच पुनम तांबे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक याप्रसंगी उपस्थित होते. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते दाढ बुद्रुक या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि अंगणवाडी इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.

आ. विखे पाटील म्हणाले की, प्रवरा सहकारी बँकेने आपल्या संपूर्ण वाटचालीत सामान्य माणसाला आधार दिला. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच अडचणीचा काळ असूनही बँकेने सप्टेंबर अखेर 1 हजार कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला. बँकेचे संचालक आणि आधिकारी कर्मचार्‍यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिर्डी मतदार संघात विकासाची प्रक्रीया सातत्याने सुरू असून, गावांच्या विकास कामांमध्ये सहकार्य करण्यास आपण कुठेही कमी पडत नाही. जिल्ह्यामध्ये इतर मतदार संघाच्या तुलनेत शिर्डी मतदार संघात विकासाच्या प्रक्रीयेत आपण पुढे आहोत. सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्येही शिर्डी विधानसभा मतदार संघ हा अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी आणलेल्या मालाच्या लिलावाची थेट प्रक्रीया आता सुरू झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी अशा प्रकारची सुविधा निर्माण करणारी राहाता बाजार समिती ही राज्यात एकमेव असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर यांची भाषणे झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com