‘तिजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा’ - आ. विखे

‘तिजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा’ - आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अर्थसंकल्पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्या

सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प असून, ‘तिजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा’ अशीच परिस्थिती आहे. त्यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्ह्याच्या पदरात या अर्थसंकल्पातून काहीही पडले नसल्याची खंत भाजपाचे ज्याटील यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आ. विखे पाटील यांनी सरकारने केलेल्या विविध घोषणांवर नाराजी व्यक्त केली. या सरकारने राज्यातील शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची कोणतीही पुर्तता केलेली नाही. दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते, परंतु त्याचा शब्दही अर्थसंकल्पात कुठेही नाही. 3 लाख रुपयांवरील कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेबाबतही सरकार काही बोलत नाही.

त्यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी ठरली असल्याचे आता स्पष्ट होते. राज्यात शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात वाढीव विजबील देण्यात आली. विजबीलाच्या संदर्भातही सरकार उदासिनच असून अनुदानाच्या रक्कमाही शेतकर्‍यांना मिळाल्या नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांना कोणताही दिलासा हे सरकार देवू शकलेले नाही हे अर्थसंकल्पातून स्षष्ट झाले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या बाबतीत जाहीर केलेल्या योजनांमध्ये केंद्र सरकारचा सहभाग आहे. केंद्राच्या सहकार्याने या योजना पूर्ण होणारच आहेत मग सरकार म्हणून तुम्ही राज्याला नवीन काय दिले? असा प्रश्न उपस्थिती करुन आ. विखे पाटील म्हणाले की, सरकारने फक्त आकड्यांचे फुलोरे फुलविले आहेत. महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने केवळ घोषणा केल्या. या योजनांसाठी निधी कुठून आणि कसा आणणार हे सरकार स्पष्टपणे सांगु शकत नाही. सरकारकडे फक्त कल्पनाशक्ती आहे. मात्र इच्छाशक्तीचा अभाव आहे हे यातुन दिसून येते. हे सरकार फक्त पर्यटनात गुंतले आहे. गृह खात्यापेक्षा पर्यटन विभागाला जादा निधी दिला जातो हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्य सरकार कमी करू शकले नाही. त्यामुळे केंद्र सरकारवर टिका करण्याचा कोणताही अधिकार महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आता राहिलेला नाही. सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली निष्क्रीयता सरकार लपविण्याचा प्रयत्न करते. नगर जिल्ह्यात असंख्य प्रश्न केवळ निधीअभावी रखडले आहेत. या प्रश्नांना अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती परंतु महत्वपूर्ण विभागांचे मंत्रीपदे जिल्ह्यात असूनही या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या हिताची कोणतीही बाब समाविष्ठ नसल्याकडे लक्ष वेधून त्यांनी एकप्रकारे खंत व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com