आ. विखे
आ. विखे
सार्वमत

विविध रस्त्यांसाठी 20 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध - आ. विखे

Arvind Arkhade

राहाता|प्रतिनिधी|Rahata

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांकरिता 20 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातून मुख्य राज्यमार्गाला जोडणार्‍या पाच महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाबार्ड कर्ज साहाय्य, अर्थसंकल्पातील तरतूद आणि विशेष दुरुस्ती निधीतून महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत.

मतदार संघातील रस्ते विकासासाठी सातत्याने निधीची उपलब्धता करून दळणवळणाच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा निधी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या कामासाठी मोठा निधी मंजूर झाला असल्याचे स्पष्ट करून आ. विखे पाटील म्हणाले की, हसनापूर, लोणी बुद्रुक, आडगाव, केलवड, नांदुर्खी बुद्रुक, निमगाव ते प्रमुख राज्य मार्गाला जोडणार्‍या मार्गांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी नाबार्ड कर्ज योजनेतून सहा कोटी 91 लाख रुपये मंजूर झाल्याने या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे.

हसनापूर, लोणी बुद्रुक, आडगाव, केलवड, नांदुर्खी बुद्रुक, निमगाव या मार्गांवरील पुलाच्या कामांसह प्रमुख राज्यमार्गाला जोडणार्‍या रस्त्यासाठी 2019-20 च्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. शिर्डी बाह्यवळण मार्गास हा जोडला जाणार असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल.

तसेच काकडी ते केलवड रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून होत असलेल्या या कामामुळे शिर्डी विमानतळाकडे जाणारा मार्ग जोडला जाईल. खडकेवाके, पिंपळस, दहेगाव, कोर्‍हाळे, वाळकी या मार्गासाठी 3 कोटी 49 लाख, खडकेवाके, पिंपळस, दहेगाव, कोर्‍हाळे, वाळकी या रस्त्यांच्या कामासाठी विशेष दुरुस्ती योजनेतून 8 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या रस्त्यांच्या कामासाठी झाली असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com