श्रीरामचंद्र मंदिराच्या भूमिपुजनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले - आ. विखे
सार्वमत

श्रीरामचंद्र मंदिराच्या भूमिपुजनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले - आ. विखे

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर| Shrirampur

आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्याचे भाग्य आमच्या पिढीला मिळाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराच्या निर्माणाचे कार्य हे देशाच्या आध्यात्मिक, सांस्कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्च मानबिंदू ठरेल, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला आनंद व्दिगुणीत केला.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात आ.विखे पाटील यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपुजनाचा सोहळा दुरचित्रवाहिनीवरून ग्रामस्थांसमवेत पाहिला. भूमिपुजनाचा मुहूर्त साधून ग्रामस्थांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली.

याप्रसंगी अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, किसनराव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, सुभाषराव विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, वसंतराव विखे, अशोक धावणे, अण्णा म्हस्के, भाऊसाहेब विखे, शंकर विखे, भारत महाराज धावणे, परशुराम विखे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष करीत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचा जातीय आणि धार्मिक सलोखा आबाधित राखून मंदिर निर्माणाचे सुरू झालेले काम हे देशाच्या आध्यात्मिकदृष्टीने महत्त्वाचे आहेच परंतु सांस्कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्च मानबिंदू ठरेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com