लोणी |वार्ताहर| Loni

पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने कृषि क्षेत्रात केलेल्या गुंतवणूकीमुळे

नागरी सहकारी बँकांना कोव्हीड संकटातही स्थिरता मिळाली. बँकींग क्षेत्रालाही दिलासा देणारे निर्णय वेळोवेळी घेतल्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळाली असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा सहकारी बँकेची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाळासाहेब भवर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक्स वाहतुक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, बँकेचे व्हा. चेअरमन अशोक असावा, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा फळे भाजीपाला सहकारी संस्थेच्या चेअरमन गिताताई थेटे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बालोटे, वसुली अधिकारी श्री. वाडीले यांच्यासह संचालक, अधिकारी, सभासद, कर्मचारी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते. या सभेत विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली.

कोव्हीड संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध आर्थिक निर्णयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

आ. विखे पाटील म्हणाले की, प्रवरा बँकेची 46 वर्षांची वाटचाल ही विचाराने झाली. खा. बाळासाहेब विखे यांनी दुरदृष्टीतून स्थापन केलेल्या या संस्थेचा आलेख नेहमीच उंचावत राहीला. अनेक चढउतार पाहिल्यानंतरही बँकेच्या ठेवीमध्ये वाढच झाली. कोव्हीड संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही बँकेने 1 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा पुर्ण केलेल्या उदिष्ठाचे कौतुक करुन या संक्रमण अवस्थेत वसुली कशी होणार हा प्रश्न असतानाही केंद्र सरकारने कर्जदारांना मोरोटोरीअम कालावधी देवून दिलेल्या दिलाशाचा सकारात्मक परिणाम बँकेच्या आर्थिक वाटचालीवर झाला.

केंद्र सरकारने सवलती कर्जदारांना दिल्यामुळेच नागरी सहकारी बँका या संकटात टिकू शकल्याचे त्यांनी सांगितले.सहकारी बँकांना बँकींग क्षेत्रातील स्पर्धेला सामोरे जायचे असेल तर चांगल्या सुविधा आणि सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन द्याव्या लागणार असल्याचे त्यांनी सुचित केले.

आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी बँकेचा एनपीए खाली आणण्यासाठी संचालक आणि अधिकारी, कर्मचार्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल अभिनंदन करुन होमलोन सुविधाही बँकेने आता सुरु केल्या पाहीजेत. चांगल्या कर्जदार आणि ठेवीदार या दोघांचेही हित साध्य करण्याचे धोरण बँकींग क्षेत्राला भविष्यात घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चेअरमन बाळासाहेब भवर यांनीही मनोगत व्यक्त केले. बँकेचा आर्थिक अहवाल डॉ.सौरभ बालोटे यांनी सभेपुढे ठेवला.