राहाता ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू करा आवश्यक मदत करतो

राहाता ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू करा आवश्यक मदत करतो

आ. राधाकृष्ण विखे यांच्या डॉक्टरांना सूचना

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता व परिसरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना कोठेही बेड मिळत नसल्याने तातडीने

राहाता ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू करा या नागरिकांच्या मागणीवरून माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या सूचना देऊन आवश्यक ती सर्व मदत स्वतः देण्याचे आ. विखे यांनी सांगितले.

रुग्णांना बेड मिळत नसल्याने सर्वसाधारण रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत असून याबाबत नागरिक व पत्रकारांनी विखे पाटलांना याबाबत माहिती दिली. राहाता ग्रामीण रुग्णालय मोठे असून येथे तातडीने कोव्हिड सेंटर सुरू करता येऊ शकते. या रुग्णालयात 30 बेड उपलब्ध असून हे रुग्णालय कोव्हिडसाठी सुरू झाल्यास गरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

आ. विखे यांनी त्वरित राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत राहाता रुग्णालयात 30 बेडचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या रुग्णालयात सुरू असलेले लसीकरण जिल्हा सहकारी बँकेच्या हॉलमध्ये करता येऊ शकते. तसेच या रुग्णालयासाठी लागणारी ऑक्सिजन तसेच इतर सुविधा आ. विखे यांनी स्वतः करून देण्याची तयारी त्यांनी यावेळी दाखविली.

ग्रामीण रुग्णालयात दोन मजल्यावर 30 बेड असून येथे आणखी बेड वाढविता येऊ शकतात. परिसरातील सर्वच नागरिकांच्यादृष्टीने हे सेंटर गरजेचे असून यामुळे वाढत्या करोना रुग्णांसाठी हे वरदान ठरेल. तसेच कमी वेळेत हे सेंटर सुरू होईल व नागरिकांचे प्राणही वाचतील. खाजगी करोना सेंटरचा खर्च परवडत नाही तसेच साई संस्थानच्या सेंटरमध्ये जागा मिळत नसल्याने रुग्ण घरातच बसून आहेत. याप्रश्नी आ. राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com