संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना च्या दुसर्या लाटेत संसर्गाचा वेग तीव्र आहे. तरुणांसह दररोज वाढणारी रुग्ण संख्या ही अत्यंत

चिंताजनक असून प्रत्येकाने करोना संकट हे अतिशय गांभीर्याने घेत गर्दी टाळत मास्कचा वापर करावा, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, मागील एक वर्षापूर्वी कोरोनाचा विषाणू महाराष्ट्रात आला. बोलता - बोलता वर्ष ठप्प झालं. अनेकांनी आपला जीव गमावला. या सर्व काळात शासनाने करोना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत चांगले होते.

मात्र मध्यंतरी नागरिकांच्या ढिलाईमुळे पुन्हा करोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अत्यंत तीव्र असून संसर्गाचा वेग जास्त आहे. या लाटेमध्ये तरुणांना व लहान मुलांनाही जास्त संसर्ग होतो आहे. हे चिंताजनक आहे. प्रत्येकाने काही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या. उपचार घेणे अनिवार्य आहे. याचबरोबर विनाकारण बाहेर पडणे टाळा. सोशल डिस्टन्सचे पालन करा.

मास्कचा वापर केलेच पाहिजे. तातडीने लस घ्या. लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढत आहे. लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नका. शासकीय यंत्रणेनेही लसीकरणाला प्राधान्य देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रशासन त्यांच्या पद्धतीने चांगले काम करते आहे. नागरिकांचेही कर्तव्य आहे की स्वतःची काळजी घेणे. स्वतःची काळजी घेतली तर कुटुंबाची काळजी घेतली जाईल. करोनाविषाणू चा प्रादुर्भाव फुफुसापर्यंत गेल्यानंतर संकट ओढवू शकते. याशिवाय यामुळे त्या माणसाला पुढील काळात ही काळजी घ्यावी लागते.

म्हणून करोना हा शत्रू आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरलाच पाहिजे. याचबरोबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. प्रत्येकाला पुन्हा मागचे आपले वैभवाचे दिवस अनुभवायचे आहेत. भरलेल्या शाळा, आनंदाचे वातावरण हे चांगले दिवस होते. ते पुन्हा अनुभवायचे असतील तसेच समृद्ध आणि प्रगत देश व्हायचा असेल.सांस्कृतिक वातावरण चांगले करायचे असेल तर करोनाला हरवणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी एकजुटीने लढूया व करोनावर मात करूया असेही ते म्हणाले.