अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.

या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच ग्रामविकास मंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासमवेत बैठक घेवून पाठपुरावा करू, असे आश्वासन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिले.

राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटने 2021 या वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ.तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिपिक वर्गीय कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. लिपीकवर्गीय कर्मचार्यांचे वेतन त्रुटी, बदल्या, शिक्षण विभागातील सुधारित आकृतिबंध, पदोन्नती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडचणी, कक्ष अधिकारी यांना वर्ग 2 चा दर्जा, वरीष्ठ सहाय्य पद 100 टक्के पदोन्नतीने भरणे, गृहबांधणी कर्ज, जिल्हा स्तवरील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, कोषाध्यक्ष भरत घुगे, कार्याध्यक्ष गणेश तोटे, राजेश तिटमे, संतोष खैरनार, चेतन चव्हाण, रामदास मिसाळ, संजय आरगडे, दीपक जोशी, संतोष देशमुख, शांताराम आव्हाड, प्रवीण कुर्हे, प्रवीण चव्हाण, विकास वर्पे, जगदीश पवार, सोलट, प्रदीप कुदळ, किशोर कुलथे आदीसह लिपीकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.