..म्हणून प्रशासनाने शेतकरी व विमा कंपनीत समन्वय साधावा

आमदार शंकरराव गडाख यांच्या सूचना
..म्हणून प्रशासनाने शेतकरी व विमा कंपनीत समन्वय साधावा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकही विमा संरक्षित शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने शेतकरी व विमा कंपनी यामध्ये समन्वय साधावा अशा सूचना आमदार शंकरराव गडाख यांनी केल्या आहेत.

नेवासा तालुक्यात 1.10 लाख हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे. कपाशी पिकांचे क्षेत्र 21 हजार हेक्टर असून त्यानंतर सोयाबीन पिकाचे क्षेत्र 8400 हेक्टर आहे. सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरचे पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिके धोक्यात येऊन शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचा विमा भरला होता त्यातील शेतकर्‍यांना कमी अधिक प्रमाणात आर्थिक लाभही मिळाला आहे.

मात्र तालुक्यात शेतकर्‍यांनी जवळपास 21 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली असून त्यापैकी फक्त 5000 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला आहे. 7252 पैकी फक्त 3117 शेतकर्‍यांनीच पिकाचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीशी संपर्क करून कळविले आहे.

उर्वरित 4135 शेतकर्‍यांनी विमा कंपनीला नुकसान झाल्याचे कळविले नाही. हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये म्हणून आमदार शंकरराव गडाख यांनीही तातडीने तालुका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या सर्व शेतकर्‍यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात फॉर्म भरून घ्यावेत व सदरचे फॉर्म तात्काळ विमा कंपनीला पाठवावेत, असे आवाहनही आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पिकाचा विमा उतरवणार्‍या शेतकर्‍यांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com