पोषण आहारासाठी अतिरिक्त निधी द्या

आ. जगताप यांची मंत्री ठाकूर यांच्याकडे मागणी
पोषण आहारासाठी अतिरिक्त निधी द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा हद्दीतील शाळा व अंगणवाडी करता अतिरिक्त पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिका महिला बालकल्याण समितीच्यावतीने 16 डिसेंबर रोजी बैठक आ.जगताप यांनी घेतली. यावेळी शहरातील शाळा व अंगणवाडीकरिता अतिरिक्त पोषण आहार सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याची मागणी पुढे आली. यामुळे आ. जगताप यांनी पुढाकार घेत मंत्री ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला. शासनाने लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सर्वसामान्य मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने या पोषण आहाराच्या माध्यमातून आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे आ. जगताप यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com