खाजगी हॉस्पिटलची करोना रुग्णांना सेवा हे कौतुकास्पद - आ. पवार

खाजगी हॉस्पिटलची करोना रुग्णांना सेवा हे कौतुकास्पद - आ. पवार

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खाजगी हॉस्पिटल पुढे येऊन रुग्णांना सेवा देत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

करोना महामारीमुळे वाढत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना जामखेडलाच सर्व सेवा सुविधा मिळाव्यात या उद्देशातून जामखेड स्वॅब कलेक्शन व कोव्हिड सेंटर व हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. राजकुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप ठोंबरे, प्रफुल्ल सोळंकी, डॉ. शेळके, सचिन गाडे, समीर शेख या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करून या अद्ययावत हॉस्पिटलचा शुभारंभ झाला.

यावेळी आमदार पवार म्हणाले, भरत दारकुंडे आणि त्यांच्याबरोबर असणार्‍या डॉक्टरांनी एकत्र येऊन हे काम चालू केले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या हातून अशीच सेवा घडो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, तसेच ज्या कोणाला करोनाची बाधा झाली असेल किंवा त्रास होत असेल त्यांनी ताबडतोब तपासणी करून घ्यावी म्हणजे उपचार करणे सोपे जाईल.

करोनासारख्या भयान रोगासाठी डॉक्टर भरत दारकुंडे आणि सर्व स्टाफ यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आपला जीव धोक्यात घालून सर्वजण काम करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण 24 तास सर्व पेशंटला सेवा देता ही फार मोठी बाब असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

या हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे म्हणाले, आम्ही जामखेडच्या करोना पॉझिटिव्ह संख्या वाढत असलेले रुग्ण लक्षात घेत, जामखेड तालुक्यातील काही रुग्णांना अहमदनगर येथे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दगावले गेले आहेत.

यामुळे आम्ही सामाजिक बांधिलकी या नात्याने करोना रुग्णांना सरकारच्या नियमाप्रमाणे चार्जेस घेऊन सेवा देणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये 17 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था आणि दोन व्हेंटीलेटरची सेवा देणार आहोत. रुग्णांना सकाळच्या चहापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत व्यवस्था हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com