आ. रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा..!

खासदार किर्तिकर यांचा इशारा
आ. रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा..!

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करतांना ठेवण्याची गरज आहे. आ. पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी.

जिल्हा नियोजन समितीचा निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशारा शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर यांनी दिला.

शिवसेनेचे शिव संपर्क अभियान टप्पा दोनचा शुभारंभ शनिवारी कर्जत येथे खा. कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय धाडी, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्विनी मते, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महिला जिल्हा संघटक मंगल मस्के, उपजिल्हा संघटक चंदनबाला बोरा, तालुका प्रमुख बळीराम यादव, जामखेड तालुका प्रमुख संजय काशीद, महिला आघाडीच्या मंदाकिनी कुलकर्णी, अमृत लिंगडे, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीर बोरा, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, चंद्रकांत घालमे, संजय शेलार, युवा सेनेचे तालुका प्रमुख दीपक गांगर्डे, शिवाजी नवले, बाळासाहेब निंबोरे, डॉ नितीन तोरडमल, शहरप्रमुख अक्षय तोरडमल, पोपट धनवडे, सुलोचना जोशी यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी अमृत लिंगडे, सुभाष जाधव, पोपट धनवडे, शिवाजी नवले, दीपक गांगर्डे व मंगेश राऊत यांनी मतदारसंघामध्ये काम करतांना शिवसैनिकांची होत असलेली अडवणूकीबाबत तक्रारी केल्या. यावेळी अश्विनी मते व राजेंद्र दळवी यांची ही भाषणे झाली आभार हरी बाबर यांनी मानले.

मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार

यावेळी बोलताना संपर्कप्रमुख संजय घाडी म्हणाले, शिवसैनिकांना जास्तीत जास्त अधिकार देण्यासंदर्भात हे संपर्क अभियान सुरू झाले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांची होत असलेले अडवणूक या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सर्व लेखी अहवाल देणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com