हातात काठी घेऊन आमदार पवार रस्त्यावर !

वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी साधला संवाद
हातात काठी घेऊन आमदार पवार रस्त्यावर !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. या बिबट्याला पकडण्याकरीता कर्जतचे आमदार रोहित पवार हेही काठी घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधत माहिती घेतली.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जालना-औरंगाबाद मध्ये काही लोकांवर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शिरला. एका उसतोड कामगाराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. चार शार्प शूटर तैनात केलेले असतानाही या बिबट्याने धूम ठोकली.

बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 5-6 जणांचा जीव गेल्याने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. यासाठी वन विभागाचे कर्मचारी सोलापूर, माळशिरस भागात गस्त घालत आहेत. करमाळा हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघाला लागून असलेला तालुका आहे.

तेथे जात त्यांनी बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला. गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधत रोहित पवार यांनी कामाची माहिती घेतली. रात्रीच्या वेळी रोहित पवार हातात काठी घेऊन वांगी सांगवी भागात फिरताना दिसले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com