कुकडी व सिनाबाबत आ.रोहित पवारांनी घेतली सिंचन भवन येथे आढावा बैठक

कुकडी व सिनाबाबत आ.रोहित पवारांनी घेतली सिंचन भवन येथे आढावा बैठक

तात्काळ शक्य असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना

कर्जत | प्रतिनिधी | Karjat

मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आठवडा भरापुर्वी मतदारसंघातील रुईगव्हाण, कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगडी, पिंपळवाडी, करमनवाडी, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी, अळसुंदे, धांडे वाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी, लोणी मसदपुर, कोरेगाव, दिघी, निमगाव-डाकु, घुमरी, कोकणगाव, नागलवाडी, नवसरवाडी, माही, मलठन आदी गावात अधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसीय दौरा केला होता. तात्काळ शक्य असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या. तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कुकडीचे अधिकारी, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही बैठकांमध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन घेत मार्गदर्शन केले होते. यावेळी पाणी संदर्भात प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अडचणी समजाऊन घेत त्या अडचणी लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. याच अनुषंगाने आ.पवार यांनी शेतकऱ्यांचे उर्वरीत प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ यांच्या समवेत पुणे येथील सिंचन भवनात नुकतीच आढावा बैठक घेतली.

पाणी नियोजन, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती आदी महत्वाच्या असलेले विषय सोडवत असताना अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेले हे विषय मार्गीही लागले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या तसेच शेतकऱ्यांना पाणी नियोजनासंबंधी असणाऱ्या अडचणी याबाबत असणारी कामे वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com