जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मालकी हक्काच्या जागेत चालू असलेल्या बेकायदेशीर महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासाठी आ.रोहित पवार यांच्या

कार्यालयासमोर खर्डा गावचे रहिवासी गौरव बागडे यांनी आज १ डिंसेबर रोजी उपोषण सुरू केले होते.

पण जामखेड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी बागडे यांना आपल्या अर्जावर मंडळ अधिकारी खर्डा यांच्या मार्फत योग्य ती चौकशी करून उचित अहवाल वरीष्ठ कार्यालयास १५ दिवसात सादर करण्याची कार्यवाही केली जाईल तरी पण आपण आपले उपोषण पासुन परावृत्त व्हावे असे लेखी आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिल्यानंतर बागडे यांनी उपोषण मागे घेण्यात आले.

खर्डा येथील संत गजानन महाराज महाविद्यालयसह इतर दोन महाविद्यालयाच्या सचिव व संचालक मंडळाने बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून जागा बळकावली सदर शिक्षणसंस्थेची मान्यता रद्द करून आत्तापर्यंत वापरलेल्या जमिनीचे भाडे मिळावे या मागणीसाठी जागामालक श्रीराम व गौरव बागडे या पितापुत्रांनी १ डिसेंबर रोजी आ. रोहीत पवार यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले याबाबतच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री व संमदीतांना पाठवल्या आहेत.

खर्डा येथील श्रीराम बागडे व गौरव बागडे या पितापुञांनी आ. रोहीत पवार व मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्डा येथील मालकी हक्काच्या जागेत संत गजानन महाराज महाविद्यालय, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, प्रगतीकला महाविद्यालय डॉ. महेश गोलेकर व विजय गोलेकर यांनी खोटे कागदपत्रे तयार करून बळकावून त्याठिकाणी महाविद्यालय उभारले आहे.

याबाबत न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आहे. सदर ठिकाणी आ. रोहीत पवार यांनी जनता दरबार घेतला परंतु तेथे न्याय मिळणार नाही म्हणून आम्ही तेथे तक्रार केली नाही.