शिंदेंना श्रेय देण्यासाठी कर्जत-जामखेडची जलसंधारण कामे रोखली

आमदार पवारांचा शासनावर आरोप
आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या कामाच्या स्थगित्या उठवल्या असताना कर्जत-जामखेडवर अन्याय केला जातो आहे, आणि ही सर्व कामे राम शिंदेंनी श्रेयासाठी रोखली आहेत असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केले आहेत.

पवार यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये पुढे म्हटला आहे की, विकासाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांना पाण्याचा गंभीर प्रश्न कायमच सतावत आला आहे. 2019 सालापासून आपण जलसंधारणाची आतापर्यंत कधीही न झालेली कामे करून घेतली. तसेच वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून आणि शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून जलसंधारणाची विविध कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणली आहेत.

त्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या होत्या. परंतु सध्याच्या सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे कामांना स्थगिती लागली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 25 ऑक्टोबर रोजी कामावरील स्थगिती उठवणे अपेक्षित असताना विशेषतः नगर दक्षिणमधील फक्त कर्जत आणि जामखेड हे 2 तालुके फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यातून वगळण्यात आले आहेत.

कर्जत-जामखेड तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या आणि सध्या स्थगित असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये दोन्ही तालुक्यातील मिळून 29 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तालुक्यात मिळून जवळपास 1110 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होणार असून आणि तब्बल 392 हेक्टर नव्याने सिंचित क्षेत्र तयार होणार आहे. त्याचा फायदा हा आसपासच्या 25 गावातील हजारो शेतकर्‍यांना होणार आहे.

या कामांना सरकारने स्थगिती दिली नसती तर आतापर्यंत सर्व कामे सुरू होऊन येत्या पावसाळ्यात त्याचा फायदा हा शेतकर्‍यांना नक्कीच झाला असता. परंतु जनतेच्या हितापेक्षा राजकारण महत्वाचं असणार्‍या लोकांमुळे ही कामे रखडली आहेत, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. लवकरात ही कामे सुरू व्हावी आणि कर्जत जामखेडवर अन्याय होणार नाही. यासाठी मी प्रयत्न करत आहे असे पवार म्हणाले.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या कामांच्या स्थगिती उठतात. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहकार्याची भूमिका असतानादेखील राम शिंदे शासन दरबारी उंबरठे झिजवत कर्जत-जामखेडमधील सगळ्याच कामांना स्थगिती द्या मला त्याचं श्रेय घ्यायचं आहे, असं म्हणत असल्याने विकासाला बाधा निर्माण होत आहे. असे गलिच्छ राजकारण थांबवण्याची गरज आहे अन्यथा कर्जत-जामखेडची जनता शांत बसणार नाही.

- आमदार रोहित पवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com