
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
विधानपरिषदेत विजय साकार केल्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांचे कर्जत तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. सिद्धटेक येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेत आमदार शिंदे हे कर्जत तालुक्यात दाखल झाले. शिंदे यांचे विविध ठिकाणी वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथे गणपतीचे प्रथम दर्शन घेतले त्यानंतर रस्त्यात ठीकठिकाणी स्वागत केले सिद्धटेक, भांबोरा, बारडगाव, राशीनसह इतर ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. कर्जत शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ प्रा. राम शिंदेच्या विजयी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ़्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी शहरात ठिकठिकाणी शिंदेचे जोरदार स्वागत करीत पदाधिकार्यांनी आपले प्रेम व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदान याठिकाणी दोन मोठे भव्य फुलांचे हार राम शिंदेंना गुंफण्यात आले. शेवटी ग्रामदैवत संत श्री सदगुरू गोदड महाराजांचे मंदिरात घेत विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यानंतर कोरेगाव व चापडगाव येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. कांचन खेत्रे यांच्यासह बिभीषण गायकवाड, धनंजय मोरे, पप्पूशेठ धोदाड, डॉ. विलास राऊत, गणेश पालवे, शेखर खरमरे व कर्जत तालुक्यातील हजारो समर्थक उपस्थित होते. खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी वर्गणी गोळा करून हा स्वागत सोहळा पार पाडला.