रोहित पवार चौकशीला का घाबरतात? आ. राम शिंदे यांची टीका

आ. राम शिंदे
आ. राम शिंदे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

रोहित पवार तुम्हाला सर्वांनाच चॉकलेटवर गंडवता येणार नाही. जर आपला कारखाना नियमात असेल तर आपण चौकशीला का घाबरता? आपलाच कारखाना फक्त शेतकर्‍यांचे हित पाहतो का? असे प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री राम शिंदे यांनी पवारांवर टीका केली.

कर्जत येथील सेवा सहकारी संस्था यांनी चालवलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये राज्य सरकारच्या आनंद शिधा वाटप या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्याहस्ते आज करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, संस्थेचे चेअरमन विक्रम धांडे, बप्पासाहेब धांडे, काकासाहेब धांडे ,काका ढेरे, अनिल गदादे ,विनोद दळवी ,प्रकाश शिंदे ,सेवा संस्थेचे संचालक मंडळ यामध्ये बाळासाहेब ढेरे ,नाना धांडे, शांतिलाल धोदाड, भाऊसाहेब लाळगे, दत्तात्रय शिंदे, बुवासाहेब धांडे, ज्ञानदेव धांडे, दादा कांबळे, संस्थेचे सचिव सचिन कदम यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्री यांनी आनंद शिधा वाटप ही गोरगरीब नागरिकांसाठी अभिनव योजना राबवली.यामुळे मतदार संघातील 75 हजार लोकांना याचा लाभ होत आहे.दिवाळीपूर्वी लोकांची दिवाळी त्यांनी गोड केली आहे.

साखर आयुक्तांनी चौकशीला उशिर केला

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड बारामती अ‍ॅग्रो या कारखान्याची चौकशी वीस तास उशिरा केली. यामुळे कारखानदाराला वेळ मिळाला. त्यांनी रात्रीतून सर्व गव्हाण धुवून काढले. याचे सर्व व्हिडिओ आपल्याकडे असून ते आपण सहकार खात्याकडे चौकशीसाठी दिले आहेत. शेखर गायकवाड हे पुढील काही महिन्यांत सेवानिवृत्त होत असून त्यांची वसंतदादा शुगर इंडस्ट्री या संस्थेवर अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.यामुळे त्यांनी अशा पद्धतीने सर्व केले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com