आ. शिंदे पवारांना म्हणाले बायका पोरांना घेऊन...

आ. शिंदे पवारांना म्हणाले बायका पोरांना घेऊन...

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

कर्जत - जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम सुरू आहे. मी तुमच्यातील आहे त्यामुळे वाढदिवसादिवशी तुमच्या सोबतच आहे. बायका पोरांना घेऊन परदेशात गेलो नाही. असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता टिका केली.

जामखेड येथे माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, बिबिषन धनवडे यांनी आयोजीत कार्यक्रम प्रसंगी अर. शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, पोपट राळेभात, प्रशांत नेटके, प्रविण सानप, डॉ. अल्ताफ शेख, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, ऋषिकेश मोरे, साकतचे माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, चेअरमन कैलास वराट, माजी सरपंच हरीभाऊ मुरूमकर, प्रा. युवराज मुरूमकर, रमेश वराट, गोरख घनवट, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, मी मागच्या दाराने आलो म्हणून विरोधक टिका करतात पण मी आमदार झालो आणी सरकार आले भाजपा ही लोकांच्या मना मनातील व तळागाळातील पार्टी आहे. अडीच वर्षे मतदारसंघातील लोकांनी खुप भोगले आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांचा मान, स्वाभीमान, आत्मसन्मान जागृत ठेवून काम करू जेणेकरून कार्यकर्त्यांची मान महाराष्ट्रात उंचावली पाहिजे. मी मंत्री असताना कुठे खड्डा नव्हता आता सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com