राम शिंदे-आ. पवारांच्या राजीनाम्यांचे फुसके बार

दावे-प्रतिदावे राष्ट्रवादी-भापज कार्यकर्त्यांमध्येच
राम शिंदे-आ. पवारांच्या राजीनाम्यांचे फुसके बार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कर्जत - जामखेड या विधासभा मतदार संघ सतत नव्या घडामोडींनी गाजत आहे. आत्ता कुठे एचएम वरून मारहाणीच्या प्रकाराने देशभरात उडालेला धुराळा खाली बसत असतानाच आमदार रोहित पवार व विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या राजीनामे आव्हांनांचा धुराळा येथे उडाला. आता दोन्ही आमदार आपआपले राजीनामे घेऊन ऐकमेकांना भिडणार असे वातावरण तयार झाले. मतदार संघासह जिल्हाच नव्हे राज्याचे याकडे लक्ष लागले होते. परंतु हे द्वंद केवळ फुसके बार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नेमके नमते कोणी घेतले याबाबत मात्र मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा भराव केल्यानंतर आमदार रोहित पवार यांचा विजयी वारून वार्‍याच्या वेगोन दौडत निघाला होता. त्यांनी प्रा. शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते फोडत शिंदे यांचे एक एक गड काबीज केले. यात सर्वात मोठा धक्का शिंदे यांची सत्ता असलेली कर्जत नगरपंचायत पवार यांनी चमत्कार करतच हाती घेतली. यावरून प्रा. शिंदे यांनी मोठे आरोप प्रत्यारोप केले. अगदी गोदड महाराज मंदिरासामोर उपोषणही केले. परंतु महाविकास आघाडीची सत्ता असल्याने प्रा. शिंदे यांचे कोणीही काहीही मनावर घेतले नाही.

यानंतर शिंदे कोषात गेले अशी चर्चा असाना विधान परिषद निवडणुकीत शिंदेंनी उमेदवारी मिळवली अन ते आमदारही झाले. इतकेच नाही तर त्या पाठोपाठ महाविकास आघाडीला अनेपक्षीत धक्का बसून राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. इकडे कर्जत - जामखेड गटात काही दिवसांपुर्वी सत्ताधारी असलेले आमदार रोहित पवार बिगर सत्ताधारी झाले तर प्रा. राम शिंदे सत्ताधारी गटाचे आमदार झाले. अचानक फासे पलटल्याने या विधानसभा मतदार संघात कोमात गेलेल्या भाजपाला पुन्हा नवसंजिवनी मिळाली.

पुन्हा कार्यकर्ते मतदार संघात दिसण्यास सुरूवात झाली. प्रा. शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करणारी शासकीय यंत्रणा पुन्हा माफी मागुन तसेच त्याच्या कारणांचे स्पष्टीकरून देऊन त्यांचे आदेश झेलू लागली. पुन्हा शिंदे यांच्या मागेपुढे पोलीस फौज फाटा मिरवू लागला. दरम्यान काही दिवसांपुर्वी कर्जत येथे झालेल्या एका मारहाणी प्रकरणी खा. निलेश राणे यांनी कर्जत येथे येऊन याविरोधात मोर्चा काढला. यातून प्रा. शिंदे यांच्या पाठिशी राज्य तसेच देशस्तरावरील मोठी ताकद असल्याचे दाखवून देण्याचे काम केेले.

दरम्यान कर्जत - जामखेड मतदार संघात मंजुर व सुरू असलेली विकास कामे आपणच मंजुर केल्याचा दावा दोन्ही आमदार करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच अचानक राजीनामा देऊन पुन्हा विधानसभा निवडणुक लढवावी व जिंकूनच दाखवावे असे आव्हान व प्रतिआव्हाने विविध सभांमध्ये दोन्ही आमदारांनी दिली. याचा मोठा हुरूप राष्ट्रवादी तसेच भाजपच्याही कार्यकर्त्यांना आला. दोन्ही पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदा घेऊन आमच्या आमदाराचा राजीनामा आम्ही आणतो ठिकाणे निश्चित करा. असे दावे केले गेले.

दोन्हीकडूनही कोण किती ताकदवान, कोणामागे किती ताकद, सत्तेच्या ताकदीची वजा बाकी याचा मोठा काथ्याकूट झाला. परंतु गेले काही दिवसांपासून अचानक दोन्ही नेते तसेच त्यांचे चेलेही अचानक थंड झाले. यामुळे राजीनामा द्वंद्व केवळ तोंडाची वाफ वाया घालवणारे फुसके बारच ठरल्याची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com