जामखेडची पाणी योजना रखडवली

भाजप आमदार राम शिंदे यांचा राेहीत पवार यांच्यावर आरोप
जामखेडची पाणी योजना रखडवली

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

भाजपचे विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी गुरुवारी जामखेड (Jamkhed) तालुक्यातील पाणी पुरवठा (Water Supply) आणि कर्जतमधील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या (Tukai Upsa Irrigation Scheme) प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावर सिंचन योजना रखडून ठेवल्याचा आरोप केला.

जामखेड पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना तसेच तुकाई उपसा सिंचन योजना यांना   मार्च २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. योजनेचे ३० टक्के काम पूर्ण देखील झाले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत आमदार रोहित पवार यांनी ही योजना बंद ठेवण्याचे पाप केले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला.

मी याबाबत मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी १८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा आणि मलनि:स्सारण योजनेवर तत्काळ सही केली. या योजनेच्या भूमिपूजनला मुख्यमंत्री येणार आहेत, असे राम शिंदे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com