काँग्रेसनेच देशावर आणीबाणी लादली

आ. राजळे : तुरुंगवास भोगलेल्यांचा भाजप युवा मोर्चातर्फे सन्मान
काँग्रेसनेच देशावर आणीबाणी लादली

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तत्कालीन काँग्रेसच्या पुढार्‍यांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करून व्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले. आणीबाणीला विरोध करणार्‍या विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगांत डांबले.आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हा भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आ. मोनिका राजळे यांनी केले.

भाजपातर्फे राज्यात 25 जून आणीबाणी दिवस साजरा केला जात आहे. आणीबाणी काळात तुरूंगवास भोगलेल्या सीताराम बाहेती यांचा व दिवंगत विजयकुमार छाजेड यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव बाळासाहेब छाजेड यांचा गौरव पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आ. राजळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सभापती गोकुळ दौंड, शहराध्यक्ष अजय भंडारी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, राहुल कारखेले, पं. स. सदस्य विष्णूपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, नगरसेवक अनिल बोरूडे, रमेश हंडाळ, नामदेव लबडे, मंगल कोकाटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशिबाई गोल्हार, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पालवे, तालुका सरचिटणीस आदिनाथ धायतडक, जमीर आतार, अशोक मंत्री, बाळासाहेब गोल्हार, महेश अंगारखे, हर्षद गर्जे, बाळासाहेब शिरसाठ यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते अशोक चोरमले यांनी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी, तर सूत्रसंचालन सरचिटणीस जे. बी. वांढेकर यांनी केले. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com