खा. सातव अभ्यासू राजकारणी- आ. विखे

खा. सातव अभ्यासू राजकारणी- आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

खा. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू आणि धडाडीने काम करणारा मित्र आपण गमावल्याची भावना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात आ. विखे पाटील म्हणाले की, मागील काही दिवसांपासून राजीव सातव कोविड संकटाचा सामना करीत होते.

यातून लवकर बरे होऊन पुन्हा सक्रीय होतील अशी अपेक्षा होती. परंतु नव्या संसर्गाने त्यांची झुंज अपयशी ठरल्याने एक चांगला मित्र आपल्याला गमवावा लागला. राजीव सातव यांनी अतिशय कमी कालावधीत राजकारणात आपली वेगळी छाप पाडली. वैचारीक भिन्नता असली तरी सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपला स्नेह कायम ठेवला होता. राजकारणातील एक तरुण उमदे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना आ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com