अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन देशाला प्रेरणादायी ठरेल - आ. विखे

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन देशाला प्रेरणादायी ठरेल - आ. विखे

लोणी |प्रतिनिधी|Loni

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन (Amrit Mahotsavi Independence Day) देशाला आत्मनिर्भरतेने पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.

प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने (Pravara Industries Group) कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण समारंभ (Flag hoisting ceremony) संपन्न झाला. आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. लोणी बुद्रुक ग्रामपंचायत (Loni Burdruk Grampanchayat), पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील (Padmabhushan Dr. Balasaheb Vikhe Patil) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था (Pravara Gramin Shikshan Sanstha), लोणी पोलीस ठाणे (Loni Police Station) आदी ठिकाणी आ. विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले. भाजपाच्यावतीने (BJP) मतदार संघात प्रत्येक बुथवर तिरंगा रॅलीचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. भाजपाचे पदाधिकारी, शक्तीप्रमुख, बुथ कमिटी प्रमुख आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

याप्रसंगी आ. विखे पाटील (MLA Vikhe Patil) म्हणाले की, स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षांचा टप्पा पूर्ण होत असला तरी स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि देशाप्रती आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वीर जवानांचे बलिदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. देशाने आजपर्यंत साध्य केलेल्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाने केलेली भागिदारी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले.

याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू, चेअरमन नंदू राठी, सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, राहुल धावणे, दिलीपराव विखे, चेअरमन चांगदेव विखे, लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, नवनीत साबळे, भाऊसाहेब विखे, संतोष विखे, प्रविण विखे, सुभाष म्हस्के, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी श्री. थिगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com