जलसंपदाने नियोजन करुन पाटपाण्याच्या तारखा जाहीर कराव्यात

जलसंपदाने नियोजन करुन पाटपाण्याच्या तारखा जाहीर कराव्यात

आ. विखे : चार्‍या दुरुस्तीसाठी मशिनरीची उपलब्धता करून द्यावी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

चार्‍यांमध्ये पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने सुक्ष्म पध्दतीचे नियोजन करून पुढील 20 ते 25 दिवसांचा नियोजन पुर्वक आराखडा तयार करून तारखा जाहीर कराव्यात. चार्‍यांच्या दुरुस्तीसाठी मशिनरीची उपलब्धता करुन द्यावी, अशा सुचना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिकार्‍यांना दिल्या आहेत.

लाभक्षेत्रामध्ये पाण्याची वाढती मागणी लक्षात घेवून आ. विखे पाटील यांनी लाभधारक शेतकर्‍यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या आधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. विखे पाटील यांनी पाण्याची वस्तुस्थिती अधिकार्‍यांकडून जाणून घेत निर्माण होत असलेल्या अडचणींबाबत मार्ग काढण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता गायकवाड, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सभापती बाळासाहेब जेजूरकर, नितीन कापसे, बाळासाहेब गाडेकर, नंदकुमार जेजूरकर, डॉ. धनंजय धनवटे, सतीष बावके, नितीनराव कापसे, बाळासाहेब गाडेकर, कॉ. राजेंद्र बावके, कैलास सदाफळ, साहेबराव निधाने, डॉ. के. वाय. गाडेकर, अ‍ॅड. विजय बोरकर, रावसाहेब देशमुख यांच्यासह पदाधिकारी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

आ. विखे पाटील यांनी गावनिहाय पाण्याच्या समस्येबाबत प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍यांकडून अडचणी जाणून घेतल्या आणि जलसंपदा विभाग यावर काय कारवाई करणार याबाबतची थेट चर्चा घडवून आणली.

आ. विखे पाटील यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, हवामानाच्या बदलांमुळे आणि समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाणी वाटपाची अनिश्चितता तयार झाली आहे. शेतकर्‍यांची पाण्याची मागणी आहे यासाठी चार्‍यांची कामे वेगाने करून घ्यावीत आणि पाणी देण्याबाबतचे नियोजन शेतकर्‍यांना आधी कवळवावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

या बैठकीत शेतकरी राजेंद्र कार्ले, बापूसाहेब लहारे, संदीप लहारे, डॉ. धनंजय धनवटे, जालिंदर गाढवे, दीपक तुरकणे, आबासाहेब चौधरी, नितीनराव कापसे, अ‍ॅड. विजय बोरकर, संजय सदाफळ, काळवाघे, विजय गोर्डे, आर. बी. चोळके, रावसाहेब देशमुख, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कॉ. राजेंद्र बावके, यांनी बंधारे भरण्याबाबत तसेच कालव्याचे नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी माहिती देत ओव्हरफ्लो मधून आमदार विखे पाटील यांच्या सुचनेप्रमाणे बंधारे भरून देणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन राहात्याचे उपअभियंता महेश गायकवाड यांनी केले.

अभियंता सागर शिंदे यांनी या बैठकीत पाण्याची असलेली सद्यस्थिती विषद करून आवर्तनाबाबतची जलसंपदा विभागाची भूमिका शेतकर्‍यांपुढे मांडली. शेतकर्‍यांनी केलेल्या सुचनांवर योग्य कार्यवाही करून पाणी सोडण्याबाबतचे पुढील नियोजन जाहीर करण्याचे त्यांनी शेतकर्‍यांना आश्वासित केले.

ओव्हरफ्लोतून बंधारे भरणार

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील तलाव, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरण्यासाठी जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी नियोजन करावे, सर्व बंधारे भरुन द्यावेत अशा सूचना जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या. अस्तगाव पिंप्रीनिर्मळ उपसा योजना सुरू करून त्याअंतर्गातील बंधारे भरा, 35 चारीच्या गेटची दुरुस्ती, कातनाल्याला नियोजनाप्रमाणे पाणी सोडा, इतर सर्व बंधारे भरुन देण्याच्या सूचना केल्याने लाभक्षेत्रातील तसेच बिगरलाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.