‘माझा बुथ सर्वात मजबूत’ हा मंत्र घेऊन बुथ प्रमुखांनी योजनांचा जागर करावा- आ. विखे

‘माझा बुथ सर्वात मजबूत’ हा मंत्र घेऊन बुथ प्रमुखांनी योजनांचा जागर करावा- आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठ वर्षाची यशस्वी कारकीर्द आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहीती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आयोजित करण्यात आले असल्याची माहीती आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. माझा बुथ सर्वात मजबूत हा मंत्र घेवून बुथ प्रमुखांनी योजनांचा जागर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या कार्यकारणीची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकूटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनिल वाणी, नितीन कापसे यांच्यासह सर्व शहर, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी राज्य कार्यसमीतीची बैठक दृकश्राव्य माध्यमातून संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी रवीजी, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत प्रामुख्याने केंद्र सरकारच्या योजनांची माहीती नागरीकांपर्यंत पोहचावी म्हणून जिल्हाभर सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व पंधरा दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उत्तर नगर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात भाजप पदाधिकार्‍यांच्या दौ-याचे नियोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संवाद, भाजयुमोच्या वतीने विकास बाइक रॅली, सशक्त बुथ अभियान तसेच महिलांसाठी विविध उपक्रमांच्या आयोजना संदर्भात जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी बैठकीत माहीती दिली.

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत सर्व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. एकीकडे मोदी सरकारची यशस्वी कारकीर्द आणि दुसरीकडे आघाडी सरकाचे अपयश जनतेपुढे मांडण्याची ही मोठी संधी आहे. कोव्हीड संकटानतर इतर देशांची परिस्थिती पाहीली तर आपला भारत देश पुन्हा आत्मनिर्भरतेने वाटचाल करीत आहे याचे सर्व श्रेय केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढत आहे. समोर तीन पक्षाच्या सरकारला जनतेत जावून सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेले नाही. संघटनात्मक मजबूतीसाठी महत्वपूर्ण आहेत. सर्व बुथ प्रमुखांनी माझा बुथ सर्वात मजबूत हा मंत्र घेवून काम करण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्य्क्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, जालिंदर वाकचौरे, सुनिल वाणी आदीची भाषणे झाली.

याप्रसंगी महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, किसान आघाडीचे सतिष कानवडे, नंदकुमार जेजूरकर, नितीन कापसे, दिव्यांग मोर्चाचे बाळासाहेब चौधरी यांच्यासह तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com