जातीय तेढ निर्माण होऊ दिला नाही हे खर्‍या अर्थाने मतदार संघाचे वैशिष्ट्ये

आ. विखे पाटील || राहात्यात शीरखुर्मा पार्टी
जातीय तेढ निर्माण होऊ दिला नाही हे खर्‍या अर्थाने मतदार संघाचे वैशिष्ट्ये

राहाता |वार्ताहर| Rahata

शिर्डी मतदार संघात आपण जातीय तेढ कधी होऊ दिला नाही, त्यामुळे या मतदार संघात सर्व जातीय धर्माच्या नागरिकांमध्ये एकोप्याचे दर्शन पाहायला मिळते, हेच खरे आपल्या मतदार संघाचे वैशिष्ट्ये आहे, अशी प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता शहरात नगरसेवक सलीम शहा यांनी आयोजित केलेल्या शीरखुर्मा पार्टीत उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.

आ.विखे पाटील म्हणाले शिर्डी मतदार संघात आपण जातीय वाद जातीय भेद कधी होऊ दिला नाही. त्यामुळे आपल्या मतदार संघात सर्वजातीय धर्मांचे नागरिक एकोप्याने राहतात हे खरे शिर्डी मतदार संघाचे वैशिष्ट्ये आहे. आपल्या मतदार संघातील नागरिकांची एकजूट हा संपूर्ण जिल्ह्यासाठी एकोप्याचा संदेश आहे. यावर्षी अक्षय तृतीया व रमजान ईद हे दोन्ही सण आपण सर्वांनी एकत्र मिळून साजरे केले हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा योगायोग आहे. शीरखुर्मा आपल्या जीवनात असाच गोडवा कायम ठेवेल. प्रत्येक वर्षी रमजान ईदला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मी शिर्डीला हजर असतो. शिर्डी ईदगाह मैदान सुशोभिकरण करण्यासाठी जवळपास 70 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.

शिर्डी मतदार संघात जातीय वादाला गालबोट कधी लागले नाही व लागणार नाही. मध्यंतरी राहाता शहराचे वातावरण गढूळ झाले होते. ते आता बर्‍यापैकी शांत झाले आहे. आपण सर्वांनी आनंदी व एकोप्याने राहावे, असे आ. विखे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. याप्रसंगी मौलाना याहिया, अ‍ॅड रघुनाथ बोठे, इलीयास शहा, राजेंद्र बावके, प्रा. राजेंद्र निकाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मौलाना इब्राहिम, सभापती भाऊसाहेब जेजुरकर, नितीनराव कापसे, कैलास सदाफळ, उद्योजक राजेंद्र वाबळे, भायूमोचे राहाता तालुका अध्यक्ष सतीश बावके, साहेबराव निधाने, डॉ. के. वाय. गाडेकर धनवंती पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, कालुभाई फ्रुट ट्रान्सपोर्ट इक्बाल शेख, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव मते, राहाता ग्रुपचे चेअरमन ज्ञानेश्वर सदाफळ, व्हाईस चेअरमन अंबादास गाडेकर, राहुल सदाफळ, प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, गणेश बोरकर, गणेश बनकर, मिलिंद बनकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, दशरथ तुपे, राजूभाई पठाण, प्रकाश पुंड, भारत लोखंडे, इकबाल चाऊस, मौलाना अल्ताफ, मौलाना अकिल, इंजि. जमील शहा, आसिफ शहा, असिफ चाऊस, राजेंद्र वाघमारे, संजय वाघमारे, दत्ता गायकवाड, विजय शिंदे, युनुस शहा, वसिम शहा, सलीमभाई, रहमान पठाण, हरुण सय्यद, फारुक शेख, शब्बीर शेख यांच्या शहरातील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईलीयास शहा यांनी केले तर आभार नगरसेवक सलीम शहा यांनी मानले.

Related Stories

No stories found.