नगराध्यक्ष कदम यांना भविष्यात धोका नाही - आ. विखे

नगराध्यक्ष कदम यांना भविष्यात धोका नाही - आ. विखे

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

नगरषरिषदेत विकासाची कामे करताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विकास कामांचा घेतलेला वसा, गावाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी, यामध्ये स्वतः विकासकामात झोकून दिल्याने ते जनतेच्या मनात बसले आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात धोका नाही, असे सूचक वक्तव्य विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भूमिगत गटार कामाचे भूमिूजन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीशिवाजीनगर येथील वृंदावन कॉलनी येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, गटनेते सचिन ढुस, नगरसेवक प्रकाश संसारे, संजय बर्डे, बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, शिवाजी मुसमाडे, तुषार शेटे, नगरसेविका संगिता चव्हाण, सुजाता कदम, बेबी मुसमाडे, नंदा बनकर, केशरबाई खांदे, कमल सरोदे, गोरख मुसमाडे, मुख्याधिकारी अजित निकत, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, सुरसिंग पवार, उत्तमराव म्हसे, सुभाष गायकवाड, विक्रम तांबे, रवींद्र म्हसे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र ढुस, शहाजी कदम, अमोल कदम, भिमराज मुसमाडे, सचिन सरोदे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, भूमिगत गटारीचे उद्घाटन ही गोष्ट काहींना रुचली नाही. कुठल्याही गोष्टीत राजकारण करण्याची काहींना सवय आहे. असे विरोधकांचे नाव न घेता ते म्हणाले. 80 कोटीच्या कामाचे उद्घाटन आ.विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. विखे-कदम कुटुंबाचा तीन पिढ्यांचा घरोबा आहे. 11 नोव्हेंबरला अध्यादेश हाती पडला. त्यामध्ये 91 दिवसात काम सुरु करण्याची अट घातली होती. 24 तारखेनंतर प्रशासक येणार असल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाचे उद्घाटन केले. काम करणारांवरच टीका होते, असा टोला त्यांनी लगावला.

माजी आ.चंद्रशेखर कदम म्हणाले, राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा असा भेदभाव आम्ही करत नाही. जाणीवपूर्वक जलतरण तलाव, योगाभवन या भागात घेतले आहेत. कोणी निंदा, कोणी वंदा, गावचा विकास हाच आमचा धंदा असे ते म्हणाले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अजित निकत यांनी तर निवेदन संतोष मते यांनी केले.

कार्यक्रमास सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर टिक्कल, सोपानराव शेटे, वसंतराव मुसमाडे, दिगंबर पंडित, नामदेव चव्हाण, भाऊसाहेब गडाख, दिलीप मुसमाडे, सुभाष कदम, नानासाहेब गागरे, प्रशांत कोठुळे, रामेश्वर तोडमल, ऋषीकेश उंडे, शशी खाडे, मनोज शिंदे, सुभाष घोरपडे, परेश सुराणा, अजित ढुस, बाळासाहेब ढुस, अशोक शेटे, बन्सी वाळके, सुरेश मोटे, संभाजी वाळके, कपिल भावसार, राजेंद्र कदम, चेतन कदम, मंगेश ढुस, रवी दळवी, किशोर थोरात, प्रा.मुसमाडे, सुनील गोसावी, भास्कर जाधव, सुधाकर कदम, वसंत कदम, प्रविण पवार, सुकुमार पवार, मनोज संकलेचा आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष कदम म्हणाले, भुयारी गटारी कामाची निविदा साडेतीन टक्के जास्त गेली. त्यानंतर दरवाढ झाल्याने हे करावे लागले.हा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. त्यावेळी तोंड उघडले नाही. आता निवडणुका जवळ आल्याने काहींच्या पोटात दुखते आहे. राज्यमंत्र्यांच्या नावाची आम्हाला अ‍ॅलर्जी नाही, ती तुम्हाला आहे. राहुरी फॅक्टरी भागात 8 ते 10 कोटींची कामे केली आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा काहींचा धंदा झाला आहे.

आमदार विखे म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे मोठा निधी राज्यांना मिळाला आहे. राज्य सरकारकडे काही नाही. राज्य सरकार कटोरी घेऊन उभे आहे. कायम केंद्रा कडे बोट, कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांना सरकारने पाच लाखाची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com