वर उपसा योजना झाल्यास मूळ प्रकल्पाप्रमाणे निळवंडेचे पाणी खाली येईल का?

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
वर उपसा योजना झाल्यास मूळ प्रकल्पाप्रमाणे निळवंडेचे पाणी खाली येईल का?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मुळ प्रकल्पा प्रमाणे निळवंडेचे पाणी ज्या गावांना यायला पाहिजे, त्या गावांना येऊ द्या, वर उपसा जलसिंचन योजना झाल्या तर खाली पाणी कसे येणार असा सवाल राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

राहाता तालुक्यातील केलवड येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब सुधाकर गमे यांच्या राधेय डाळमिल उद्योग समुहाला भेट देत त्यांनी वादळाने केलवड भागात झालेल्या नुकसानीची पाहणीही केली. त्याप्रसंगी आयोजित समारंभात आमदार विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, राहाता बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे, केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, युनियनचे प्रसाद तांबे, उद्योजक सुरेश गमे, नामदेव घोरपडे, सचिन मुरादे, जालिंदर मुरादे, सरपंच सौ. संगीता कांदळकर, दीपक कांदळकर, उपसपंच विशाल वाघे, माजी सरपंच सौ. सविता गमे, पोपटराव गमे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निळवंडे प्रकल्पातील वरच्या भागात उपसा जलसिंचन योजना वाढत आहेत. या प्रकल्पाचे पाणी अजून खालच्या भागात यायचे आहे. असे सांगून या योजनांना जलसंधारण मंत्र्यांनी अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत. आघाडीचे लोक दररोज सांगतात की, पाणी आणणार असे सांगत आमदार विखे पाटील म्हणाले, निळवंडेचे पाणी खाली आलेच पाहिजे. परंतु ते मूळ अराखड्याप्रमाणे आले पाहिजे.

ज्या गावांना पाणी यायचे त्या गावांना पाणी येऊ द्या! परंतु वरच जर पाण्याचे वाटप सुरू झाले तर कसे होणार? केलवड चे बाळासाहेब गमे व कुटुंबियांनी उत्तम शेती करून पुरक व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भागात राधेय डाळमिल सारखा व्यावसाय उभा राहाणे हे कौतुकास्पद आहे. शिर्डी सारख्या ठिकाणी शेतकर्‍यांनी तयार केलेल्या मालाला ग्राहक भेटतील. कृषी मंत्री असताना अनेक योजना राबविल्या होत्या. त्यामुळे जिरायती भागाला मोठा फायदा झाला होता. सध्याच्या सरकारने यातील काही योजना बंद केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास घोरपडे यांनी केले. कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब गमे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रशांत गमे यांनी आभार मानले. रेशीमचे माजी आयुक्त मच्छिंद्र राऊत, चांगदेव राऊत, जगन्नाथ काटकर, देवराम कांदळकर, रंगनाथ गमे, यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी मंत्री असताना अस्तगावला केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपण शेड नेटमध्ये शेती, आधुनिकता आणली. शेती पुरक उद्योग सुरु करता आले. असे बाळासाहेब गमे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com